कौटुंबिक बजेट कसे तयार करावे ते ही कमी पैशात ? | Family Monthly Budget

कमी पैशात कुटुंबाचे महिन्याचे बजेट कसे काढायचे ? | How To Manage Family Monthly Budget

 

मित्रांनो कमी पैशात कुटुंबाचे महिन्याचे बजेट कसे काढावे किंवा का काढावे आणि ते कमी पैशांमध्ये कसे काढणार ते आपण या आजच्या ब्लॉग मध्ये बोलणार आहोत समजून घेणार आहोत, आपण मागच्या ब्लॉग मध्ये पाहिले होते की घरगुती badget कसे ठरवायचे किंवा काढायचे तर या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत कुटुंबाचे महिन्याचे badget कसे काढायचे किंवा ठरावयाचे,

तर एक एक करून आपण या गोष्टी समजून घेऊयात की कमी पैशांमध्ये Family monthly budget कसे काढायचे.

 

Family Monthly budget

 

How To Manage Family Monthly Budget

 

1) उत्पन्न आणि खर्च याचा आढावा घ्या

सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला आपल्या महिन्याचा पगार आणि महिन्या भरात जो काही खर्च लागणार आहे त्या गोष्टी वरती जास्त लक्ष दिले पाहिजे म्हणजे की आपल्याला किराणा किती लागणार आहे, दूधवाल्याचे बिल किती आहे LIGHT BILL किती आहे, आपला महिन्याचा गाडीखर्च साधारण किती असणारे आहे आणि त्यामधून आपल्याला काही बचत बचत ही करायची आहे, 

तर या गोष्टी तुमच्या ठरवून झाल्या आहेत असं आपण गृहीत धरू आता आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे खालील प्रमाणे.

 

family monthly budget in marathi

 

2) प्राथमिक गरजांना प्राधान्य द्या

आधी आपण समजून घेतला की आपला महिन्याचा पगार आणि जे काही खर्च होणारे आहेत त्याचा आढावा घ्या आणि आता आपण समजून घेणार आहोत ते कशा प्रमाणे,

तर मित्रांनो पृथ्वी तलावराच्या प्रत्येक प्राण्याला काहीनाकाही गरजा असतातच पण पण त्यातूनही सर्वात महत्वाची गरज कोणती आहे हे ओळखता यायला पाहिजे जर ती तुम्ही ओळखू शकलात तर तुम्हाला Family Monthly Budget काढणे हे सहज शक्य होईल,

जशी हिंदी मध्ये म्हण आहे ना ” रोटी कपडा आणि मकान” या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत या तर आपल्याला भागावायाच्या आहेतच पण सोबत व्यतरिक गरज म्हणजे मोबाईल खर्च, इस्त्री खर्च, नवीन फॅशन आलीये तर चला आपण हे घेऊ ते घेऊन वगैरे… तर यांनाच म्हणतोय आपण प्राथमिक गरजा तर त्या ओळखायला शिकले पाहिजे.

आता आपण तिसरा मुद्दा समजून घेऊयात खाली दिल्या प्रमाणे….

 

Monthly budget

 

3) महिन्याची बचत निश्चित करा

मित्रांनो तुम्हाला तुमच्या महिन्याच्या पगारातून काही निश्चित रक्कम ही बचती साठी काढली पाहिजे आणि ती काढून तिला कुठेतरी गुंतवले ही पाहिजे, तुम्हाला ही सांगायला हवी की आपल्या Monthly Salary मधून 20% भाग हा आपल्या बचतीचा असला पाहिजे जेणेकरून कालांतराने आपण चांगले भविष्य पाहू शकू किंबहुना विचार करू शकू,

आता आपण family monthly budget मधल्या चौथ्या गोष्टी कडे वाळूया 👇

 

budget 2025-26 marathi

 

4) अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा

पहा मित्रांनो आपण कुटुंबा मध्ये राहतो आणि कुटुंबा मध्ये वेगवेगळे विचार करणारी डोकी ही असतात आणि त्याच्या आवडी निवडी ही तशाच असतात, म्हणजे पाहायला झालाच तर आई, वडील, बहीण, भाऊ आणि मुलगा वैगेरे आणि जर एकत्र कुटुंब असेल तर गोष्टच निराळी, हा तर मुद्दा हा आहे की अनावश्यक खर्च टाळण्याचा तर सोडाच तो होणे हे लिखित च आहे परंतू आपल्याला आपल्या family budget चा विचार तर केलाच पाहिजे.

आता आपण पाचव्या मुद्द्याकडे वळूया तो म्हणजे खालील प्रमाणे….

5) आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी ठेवा

Monthly Family Budget चा विचार करत असताना सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या आपताकालीन परिस्थिती साठी ही monthly salary मधला काही भाग बाजूला ला काढून ठेवला पाहिजे कारण परिस्थिती ही कोणावरही येऊ शकते आणि ती कधी येणार ते कोणालाही माहिती नाही म्हणून ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि माझ्या या ब्लॉग ला ही.

 

आता आपण हळू हळू गंभीर विषयाला हात घालणार आहोत ते म्हणजे आपली सहावी महत्वाची गोष्ट खालीलप्रमाणे..

 

6) कुटुंबातील सदस्यांना सहभागी करा

बघा मी आत्ताच सांगितले होते की वाईट परिस्थिती किंवा आपताकालीन परिस्थिती ही कोणावरही येऊ शकते पण मित्रांनो प्रत्येक परिस्थिती मध्ये आपल्या एकट्याला ती परिस्थिती सांभाळून घेता येत नाही जस की कोणतेही मोठे कर्ज आहे किंवा तुमचा business अचानक ठप्प पडला तर अशा वेळेस तुमच्या एकट्याची ही गोष्ट नाही तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते की आपण ही या परिस्थिती मध्ये हातभार लावावा म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मंडळींना या मध्ये सहभागी करा जेणेकरून तुमचे ओझे हलके होईल.

बजट 2025-26 मराठी

 

सातवा महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो,

 

7) वार्षिक लक्ष्य ठरवा

आपल्या घरात किंवा आपल्या प्रत्येकाला एक स्वप्न असते की पुढे जाऊन आपण हे करू ते करू म्हणजे आपण कार घेऊ, घर घेऊ, उच्च शिक्षण घेऊ, परदेशी फिरायला जाऊ तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी ही आपल्या monthly family budget मध्ये असला पाहिजे.

शेवटचा आणि तो ही तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे

 

 

8) आर्थिक सल्लागाराची मदत घ्या

हे सर्व करत असताना आपल्याला कधी कधी माहिती नसतं की बचत कशी करायची आहे कोठे करायची आहे, पैसे कसे जमवायाचे ते कसे वापरायचे, ते कुठे गुंतवायचे तर यासाठी जर तुम्ही आर्थिक सल्लागारा ची मदत किंवा सल्ला घेतला तर फारच बरे होईल हे जरूर लक्षात ठेवा.

 

 

निष्कर्ष :- तर मित्रांनो आपण एकटे असू किंवा कुटूंबाची व्यक्ती असू आपल्या गरजेनुसार आपल्या मध्ये बदल तर करायलाच हवे त्यातील मोठा बदल म्हणजे आर्थिक नियोजन असणे किंवा family monthly budget याच्याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे,

मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग महत्वपूर्ण वाटला असेल किंवा या ब्लॉग मध्ये तुम्हाला काहीतरी value मिळाली असेल तर नक्कीच खाली कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून मला कळवा आणि जास्तीत जास्त मित्रांना परिवाराला share करा, तुमच्या सोयीसाठी खाली बटन्स दिलेले आहेत तिथून तुम्ही सहजरीत्या share करू शकता तर पुढच्या ब्लॉग किंवा लेखा पर्यंत 

धन्यवाद 

Leave a Comment