पैसे कसे वाचावायचे? | How To Save Money

पैसे कसे वाचावायचे? | How To Save Money

 

नमस्कार मित्रांनो! माझं नाव राहुल वाघमारे आहे आणि आपलं स्वागत आहे माझं पहिलं आर्थिक ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये, मी आपल्याला आर्थिक सुरक्षितता किंवा पैसे वाचावायचे कसे आणि त्यांचे नियोजन योग्य त्या रिते कसे करायचे किंवा वाढवण्याच्या काही सोप्प्या टिप्स देणार आहे.

 

आर्थिक सुरक्षितता हा महत्वाचा विषय आहे, पण अगदी सोप्प आणि सुनीयोजित पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा किंवा समाजावण्याचा प्रयत्न करणार आहे

Tip 1: नियोजन

पहिलं टिप: मित्रांनो या पहिल्या टिप्स मध्ये आपल्याला आपल्या पैशांचे योग्य ते नियोजन करता आले पाहिजे आणि जर नियोजन करता आले नाही तर तुमचे मेहनतीने कामावलेले पैसे नेमके जातात कुठे हेच तुम्हाला कळणार नाही आणि मग तुमचे पैसे लवकर संपतील आणि महिन्याच्या शेवटीला कोणाकडून तर पैसे उसने घेणे हा भाग चालू होईल त्यासाठी तुमच्या कडे किती पैसे आलेत आणि ते कुठे कुठे वापरणार आहात याचा कच्चा चिठ्ठा तुमच्याकडे असायला हवा,

म्हणजे आता तुम्हाला किराणा घ्यायचा आहे, तुमच्या गाडीत पेट्रोल टाकायचे आहे, लग्न झालेच आहे तर मुलाच्या शिक्षणाचा खर्च बाकी तुमचा वयक्तिक खर्च असं संपूर्ण खर्च आखून आता तुमच्याकडे किती पैसे उरतात त्याचा हिशोब वगैरे

हा तुमच्या आर्थिक आदर्शांच्या साधारण स्थितीचा अभ्यास आहे.

how save money
how to save money

मित्रांनो पैसे वाचावण्याच्या या टिप्स मध्ये दुसरी टिप्स म्हणजे

 

(Tip 2: Emergency Fund)

मित्रांनो आता या दुसऱ्या टिप्स मध्ये तुम्हाला अंदाज लागलाच असेल की मी कशा बद्दल बोलत आहे .

बघा अडचणीचा काळ आणि आपताकालीन परिस्थिती कोणालाच चुकलेली नाहीये, या एकविसाव्या शटकात राहतो आणि या शतकमध्ये आपण घरातून बाहेर पडतो ते पैशांसाठीच आणि अशा वेळेस कोणतेही क्षण आपल्यावर येऊ शकतात हे आपल्याला विसरून चालणार नाही यासाठी आपण पूर्णपणे तयार राहायला हवे.

म्हणून आपल्याला या अशा अडचणीच्या काळात उपयोगी पडतील इतके पैसे तरी एका बाजूला काढले पाहिजेत जेणेकरून कोणासमोर हात पसारावण्याची स्थिती आपल्यावर येणार नाही म्हणून हा Emergency Fund आपल्याला ठेवायला हवा आणि हीच माझी आपल्या सर्वांना विनंती देखील आले.

 

मित्रांनो आता या पैसे वाचावाण्याच्या भागामध्ये तिसरी टिप्स आपल्याला जाणून घ्यायची आहे ती म्हणजे खालील प्रकारे

 

(Tip 3: Investing)

मित्रांनो इन्व्हेस्टिंग हे तर तुम्हाला माहीतच असेल असं मी गृहीत पकडतो कारण या धावत्या जगामध्ये मला माहिती आहे तुम्ही कुठेनाकुठे गुंतवणूक करतच असाल म्हणजेच आपल्या सर्व मूलभूत गरजा भागवून झाल्यानंतर जे पैसे उरतात त्या पैशांची योग्य त्या ठिकाणी आणि योग्य त्या मार्गाने गुंतवणूक ही आपल्याला करायला हवी कारण याच गुंतवणूकीच्या परतवा किती मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही,

आता तुम्ही म्हणाल ही गुंतवणूक ठीक आहे पण ही नेमकी करायची कुठे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर यासाठी इंटरनेट वर भरपूर असे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही सुरक्षित पद्धतीने गुंतवणूक करू शकता आणि यामधून योग्य तो परतावा किंवा प्रॉफिट कमावू शकता जसे की grow app आहे आणि यासारखेच इतर प्लॅटफॉर्मस आहेत तिथे जाऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.

 

 

मित्रांनो या सर्व गोष्टींचा सारांश म्हणजे आपल्याला आपल्या गरजा भागवून काहीतरी बचत ही केलीच पाहिजे जेणेकरून आपले आणि आपल्या परिवाराचे भविष्य सुरक्षित होऊ शकेल 

 

 

तुम्ही आम्हांला यूट्यूब चॅनेल वर आणि सोशल मीडिया वरही फॉलो करू शकता. पुढील अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेट रहा!

नेहमी खुश आणि आर्थिक सुरक्षित राहा.

आभारी आहे!

 

 

Leave a Comment