Torres Company Fraud: टोरेस घोटाळा नेमका काय आहे, तुम्हीही पैसे गुंतवलेत का ?
मित्रांनो जग बदलत चालले आहे आणि त्यासोबत आपण ही बदलायला हवं पण हे कितपर्यंत खरं आहे ते आजच्या उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल.
हा मित्रानो torres company fraud
आत्ता आपल्याला सर्वत्र वायरल झालेल्या बातम्या ऐकण्यात आल्या असतील किंबहुना आपल्या मधलाच किंवा आपल्या परिवारा मधीलच एखादा व्यक्ती या घोटाळ्यात शामिल होऊन स्वतः चे नुकसान करून घेतले ही असेल.

तर आजच्या या ब्लॉग मध्ये याच मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे.
प्रथमता आपल्याला हे जाणून घ्यायला हवं की आपण आपल्या कष्टाच्या कमाईची गुंतवणूक जी करत असतो तर ती कोणत्या ठिकाणी करत आहोत, त्यामधून आपल्याला योग्य तो परतावा मिळणार आहे की नाही किंवा किती कालावधी नंतर हा परतावा मिळण्याची खात्री आहे याची खतराजमा आपल्यालाच करायला हवी हे खरं आहे ना, मग कसं काय आपण डोळे झाकून एखाद्या fraud कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतो याचाच मला आश्चर्य वाटत आहे
Torres Company Fraud,
टोरेस घोटाळा आहे नेमका काय हे जाणून घेऊ.
टोरेस कंपनीच्या घोटाळ्यात अनेक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे उघडकीस आले .
मित्रानो दादर येथील एका भाजी विक्रेता प्रदीपकुमार वैश्य यांनी या कंपनी मध्ये ४ कोटी २७ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. ही रक्कम त्यांनी पत्नी, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि घर गहाण ठेवून जमा केली होती. आणि त्यांचं दुर्दैव हे आहे की हे पैसे बुडाले आणि एखाद्या परकीय कंपनी मध्ये गुंतवणूक करत असताना त्यानां आपल्या कुटुंबाचा विचार ही करायला हवा होता.
तौशिफ रियाज
आणि
सर्वेश अशोक सुर्वे आधार कार्ड ऑपरेट यांचं तर नाव ऐकलंच असेल तुम्ही, दादर या ठिकाणी स्थित असल्याल्या एका कथित दागिन्याच्या शोरूम चे सूत्र संचालन करत होते हे सर्वेश अशोक सुर्वे आणि अजब गोष्ट म्हणजे ते एका आधार कार्ड सेंटर चे ओपॅरेटर म्हणून काम पाहायचे,
कसं काय शक्य होऊ शकते पण याच्या वर विश्वास ठेवण्या व्यतारिक्त आपल्याकडे काही पर्यायच उरलेला नाही आहे.
टोरेस कंपनीने सोने, चांदी आणि मोइसॅनाइट स्टोन (कृत्रिम हिरे) खरेदीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले होते. गुंतवणूक केलेल्या रकमेच्या सुरक्षेसाठी कंपनीने गुंतवणूकदारांना हिरे म्हणजेच खोटे दगडाचे खडे दिले होते, ज्यांची किंमत त्यांनी गुंतवलेल्या रकमेइतकी असल्याचे सांगितले जात होतेआणि याच अमिषाला बळी पडून गरीब लोकं गुंतवणूक करत होते . मात्र, प्रत्यक्षात या हिऱ्यांची बाजारभाव किंमत केवळ ५०० रुपये असल्याचे आढळले आहे.
टोरेस घोटाळा
कंपनीच्या मालकाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन दुबईला पळून गेल्याचे समजते. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
मित्रांनो या सर्व प्रकारचा सारांश म्हणजे आपली मेहनतीची कमाई इतक्या सहज पणे कुठे ही गुंतवणूक करून चालणार नाही याबाबत आपल्याला विचार करायला हवा आहे आणि इंटरनेट च युग आहे माहिती विकता ही येते आणि वापरता ही येते याची माहिती असायला हवी.
व्हिडीओ च्या माध्यमातून पाहण्यासाठी इथे पहा
https://youtu.be/x6Z60fV-Q00?si=ys-W4ZuHTVVmlUk5
मित्रांनो धन्यवाद ब्लॉग इथपर्यंत वाचत आहात त्यासाठी जागरूकता ही पसरली पाहिजे आणि तुम्ही ही हे करू शकता खाली share करण्यासाठी बटण दिलेले आहेत जा आणि समाजामध्ये जागरकता पसारावा.