What Is Credit Card? In Marathi | क्रेडिट कार्ड म्हणजे काय : फायदे आणि नुकसान

What Is Credit Card?In Marathi | क्रेडिट कार्ड म्हणजे काय : फायदे आणि नुकसान

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉग मध्ये मित्रानो मला माहीत आहे तुम्ही आणि काही श्रीमंत घरातील नसणार आहे आणि जास्त पैसे खर्च करणे किंवा गरजेचे नसेल त्यावर व्यतरिक खर्च करने आपल्याला सध्या तरी जमणार नाहीये पण एक गोष्ट आहे आपण जर विचार केला तर हे आपण नक्कीच करू शकतो आणि credit card चा योग्य वापर करून करू शकतो , हो नक्कीच याच गोष्टी या ब्लॉग मध्ये असणार आहे,
आणि आपण श्रीमंत तर नाही बनणार पण इतकी खात्री देऊ शकतो की आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी या क्रेडिट कार्ड चा वापर करता येऊ शकतो, त्याआधी मित्रानो आपण प्रथम जाणून घेऊया की हे क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

 

क्रेडिट कार्ड म्हणजे काय

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे आर्थिक साधन आहे जे बँक किंवा वित्तीय संस्थांद्वारे म्हणजेच एखाद्या बँक द्वारे ग्राहकाला पुरवले जाते. याचा उपयोग करून ग्राहक आपल्या खात्यात पुरेशी रक्कम नसतानाही वस्तू किंवा सेवा खरेदी करू शकतात. बँक ग्राहकाला काही निश्चित मर्यादेपर्यंत उधार रक्कम (क्रेडिट लिमिट) वापरण्याची परवानगी देते. यासाठी ग्राहकाला नंतर बिल भरावे लागते.

 

क्रेडिट कार्डचे फायदे:

तातडीची खरेदी:

मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या दुकानावर खरेदी करायला जातो किंवा एखाद्या नामांकित मॉल मध्ये खरेदी करावयास जातो तेव्हा ते खूपच खर्चिक असतात तेव्हा आपल्याकडे इतके पैसे ही नसतात पण वस्तू विकत घेणे खूप गरजेचे असते अशा वेळेस आपल्याला माहित पाहिजे  क्रेडिट कार्ड म्हणजे काय?  म्हणजेच क्रेडिट कार्ड चा उपयोग करता येतो जिथे आपण पैसे तर देतोय पण कॅश च्या स्वरूपात नाही तर डिजिटल च्या मार्फत त्याचे भुगतान आपण करतो, आता तुम्हीच सांगा की हे क्रेडिट कार्ड आपल्या किती फायद्याचे आहे.

What is credit card use

सुविधाजनक वापर:

तर मित्रांनो आत्ताच जमाना हा ऑनलाइन चा चालू आहे जिथे आपल्याला कोणतीही गोष्ट जर खरेदी करायची असेल तर सहज उपलब्ध होऊ शकते आणि ती खरेदी ही लगेचच करू शकतो तर अशा वेळेस क्रेडिट कार्ड इथे आपल्याला सर्वात जास्त उपयोगास येते कारण कोणताही सण असो किंवा उत्सव असो आपण नवीन कपडे किंवा भेट वस्तू खरेदी करत असतो तर CREDIT CARD ने पेमेंट करून आपल्या पत्त्यावर सहज मागवून आपल्या खरेदीचा वेळ वाचवू शकतो हे नक्कीच.

कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स:

सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपण जेव्हा किराणा किंवा रिटेल कापड्यांच्या दुकानामधून खरेदी करतो तेव्हा आपल्याला कॅशबॅक किंवा कोणत्याही प्रकारचे रिवार्ड मिळत नाही पण आपण जेव्हा डिजिटल खरेदी करतो तेही WHAT IS CREDIT CARD द्वारे तेव्हा आपल्याला खरेदीवर कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स किंवा डिस्काउंट मिळत असतो तर तुम्हीच सांगा हे क्रेडिट कार्ड किती महत्वाचे आहे.

How to use credit card

क्रेडिट स्कोअर सुधारणा:

मित्रांनो आपल्या सर्वांच्याच घरी लाईट असणार आहे, इंटरनेट असणार आहे, tv केबल असणार आहे किंवा आपल्या हातात जे यंत्र आहे म्हणजेच मोबाईल त्याचे बिल असणार आहे तर या सर्वांचे बिल आपल्याला केंद्रात जाऊन भरता येत नाही तर आपण इथे ही डिजिटल च्या माध्यमातून आणि क्रेडिट कार्ड च्या साहाय्याने ते बिल वेळेवर भरून आपला क्रेडिट स्कोर सुधारू शकतो जेणेकरून आपल्याला कधी कर्ज घेण्याची वेळ आली तर हाच क्रेडिट स्कोर मदत करू शकतो लक्षात ठेवा.

आंतरराष्ट्रीय खरेदी:
आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्यवहार करता येतो.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत:

मित्रांनो एमेरजेन्सी किंवा कठीण काळ हा कोणालाच चुकलेला नाही हा सर्वांच्याच आयुष्यात येत असतो तर अशा वेळेस CREDIT CARD हे माध्यम खूप उपयोगी ठरु शकते याने आपण अशा काळमध्ये खर्चाची सोय उपलब्ध करून घेऊ शकतो .

क्रेडिट कार्ड चा कोणकोणते उपयोग आहेत 

फसवणूक संरक्षण:

अनेक वेळेस आपल्यासोबत डिजिटल फ्रॉड घडणे हे आजच्या या युगामध्ये सहज शक्य होतं असते आणि याच अनेक कार्डांवर फसवणुकीपासून संरक्षण मिळते आणि ट्रान्झॅक्शन रिव्हर्स करणे शक्य असते.

मित्रांनो आपण आता क्रेडिट कार्ड चे तोटे जाणून घेऊया.

क्रेडिट कार्डचे तोटे:

 

व्याजदर:

मित्रांनोव्याजदरकिंवाजास्तीचा interest rate क्रेडिटकार्डनेकोणतीहीखरेदीकरूशकतोहेतरखरेआहेपणया credit card द्वारेखरेदीकेलेलीरक्कमआपल्यालाठराविकवेळेतभरावीहीलागतेआणिवेळेतबिल न भरल्यासमोठ्याप्रमाणावरव्याजआपल्यालाद्यावेलागते.

वाढते खर्च:
आहे ना क्रेडिट कार्ड तर कशाला टेन्शन घायचे अशा प्रकारची ही काही लोकं असतात अशा वेळेस काही ही विचार न करता पण खरेदी करत राहतो आणि क्रेडिट कार्ड वरील रक्कम ही नकळत वाढत जाते आणि नंतर बिल आल्यावर आपल्या लक्षात येते की आपण खूप जास्तच खरेदी केली आणि मग नंतर पश्चताप होतो आणि त्याचे बिल आपल्याला विनाकारण भरावेच लागते, ज्यामुळे कर्ज वाढते.
दंड आकारणी:
वेळेवर बिल न भरल्यास उशीर शुल्क (लेट पेमेंट फी) लागू होतो.
क्रेडिट स्कोअर खराब होणे:
बिल न भरल्यास क्रेडिट स्कोअर खराब होऊन भविष्यात कर्ज मिळणे कठीण होऊ शकते.
फसवणूक धोका:
कार्ड चोरी किंवा क्लोनिंगमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.

 

नियम न कळल्यास फसवणूक:
बँकेच्या अटी आणि शर्ती नीट न वाचल्यास लपलेल्या शुल्कांचा फटका बसू शकतो.

 

सवयीचा गैरफायदा:
सतत क्रेडिट कार्डवर अवलंबून राहिल्यास आर्थिक नियोजन बिघडते.

 

 

निष्कर्ष:
क्रेडिट कार्ड योग्य प्रकारे वापरल्यास फायदेशीर ठरते, पण बेजबाबदार वापरामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे खर्च नियोजन, वेळेवर बिल भरणे, आणि फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

 

What is credit card use in marathi?

 

 

तर मित्रांनो अशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि यामधील माहिती तुम्हाला उपयोगी किंवा valuable वाटली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत ही share करा आणि ब्लॉग वर नवीन आला असला तर खाली कमेंट करा आणि जाता जाता आपला mail id ही रजिस्टर करा जेणेकरून आपल्याला अशाच महत्वापूर्ण ब्लॉग्स चे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळू शकेल.
धन्यवाद

Leave a Comment