
Hello, माझं नाव राहुल वाघमारे आहे आणि मी एक Private company मध्ये tech supervisor म्हणून काम करतो.
या भागात मला 12 वर्षाचा अनुभव आहे पण हा अनुभव घेत असताना मला खूप अडचणींना सामना करावा लागला आणि तितकेच सहन ही केले,
पहा मित्रांनो जबाबदारी ही कोणालाच चुकलेली नाही आणि ही सर्वांनाच पार पाडावी लागते हेच माझ्यासोबत ही झाले.
माझा जन्म मूळचा पुणे जिल्ह्यात देहूरोड या शहरामध्ये झाला जे मिलिटरी भागामध्ये येते इथून पुढे माझे बारावी पर्यंतचे शिक्षण ही तिथेच झाले पण या नंतर काहीच दिवसांनी म्हणजेच 2006 ला माझ्या वडिलांचे निधन झाले आणि संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या खांद्यावर येऊन पडली, तुम्हाला माहीतच असेल की हे दुःख काय असत तर तिथून आम्हाला सरकारी कोटर्स सोडून भाड्याच्या घरातही राहावे लागले पण आता दोन बहिणींचे लग्न बाकी होते, शिक्षण बाकी होते त्या गोष्टींसाठी माझी पुरेशी तयारी तर झालेली नव्हती पण आता मला माझ्या शिक्षणा सोबत काम करणे ही भाग पडले.
मी नोकरी शोधायला सुरवात केली पण वय कमी असल्यामुळे कोणी नोकरी द्यायला ही तयार नव्हते पण मी हिम्मत नाही हरली काहीनाकाही करून मी जय हिंद नावाची कंपनी जॉईन केली तिथे मला पगार अर्थातच कमी hota पण मी माझ्या परिवाराला काहीतरी सपोर्ट करेल अशा प्रकारे पगार मिळत होता, तिथे असतानाच माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न होऊन ती मुंबई ला राहायला आली होती आणि तिथून पुढे आमचा मुंबई चा प्रवास सुरु झाला बहिणीच्या ओळखीने आम्हाला मुबंईत कल्याण या ठिकाणी घर मिळालं त्या वेळेस स्वस्त मिळालेलं हे घर म्हणजेच मुंबईत माझ्या संघर्षाचा पाया होता आता मला मुबंईत ही नोकरी शोधायला खूप कष्ट करावे लागले ते ही मी केले आणि हळू हळू का होईना माझ्या परिवाराला हातभार लावत गेलो.
आता तुम्ही म्हणाल मला ब्लॉगिंग बद्दल कुठून कळलं तर हो नक्कीच youtube वरून मला कळलं आणि काहीतरी इन्कम व्हावी याच उद्देशाने मी हा ब्लॉग सुरु केला आहे आणि याच प्रवासा मध्ये मी कशा प्रकारे परिस्थिती ला सांभाळून काम केले आणि इथ पर्यंत पुढे आलोय ते ब्लॉग द्वारे तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये तुम्हाला पुढील प्रकारचे ब्लॉग वाचायला मिळतील.
Finance blog
Motivatonal blog
Personal finance tips
How to get loan
आणि खूप काही आपली सोबत असेल तर खूप काही करू शकतो तर आशा करतो तुम्ही support कराल
धन्यवाद.
तुम्ही मला social media वर ही follow करू शकता
Facebook :- https://www.facebook.com/share/15uxvf6zRC/?mibextid=qi2Omg
Youtube :-https://youtube.com/@aplibachatbyrahul?si=2XOSgmZIoU88ogGq
aplibachat.in