महिन्याचे किराणा बजेट कसे ठरवायचे? संपूर्ण माहिती | Grocery Monthly Budget In Marathi

महिन्याचे किराणा बजेट कसे ठरवायचे? संपूर्ण माहिती | Grocery Monthly Budget

मित्रांनो Monthly Budget मधला मोठा भाग Grocery Monthly Budget किंवा सामानावर खर्च होतो. अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त खर्च करून नंतर पश्चात्ताप करतो. त्यामुळे योग्य मासिक किराणा बजेट तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. एक संतुलित बजेट केवळ पैसे बचत करण्यासाठी मदत करत नाही, तर घरगुती आर्थिक व्यवस्थापन देखील सुलभ व सोयीस्कर करत असते .

या ब्लॉगमध्ये मासिक किराणा बजेट कसे तयार करावे, पैसे कसे वाचवावे आणि खर्च नियोजन कसे करावे याची संपूर्ण माहिती मिळेल त्यामुळे संपूर्ण वाचन करा खास करून महिला .

 

Monthly Grocery Budget

 

प्रथम आपण जाणून घेऊ की हे मासिक किंवा महिन्याचे किराणा बजेट नेमके काय?

 

monthly grocery shopping marathi

 

1. मासिक किराणा बजेट म्हणजे काय?

मित्रांनो आपल्या घरातील दर महिन्याच्या अन्नधान्य, भाज्या, फळे, दूध, स्नॅक्स, मसाले आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू यासाठी केला जाणारा सुनियोजित खर्च म्हणजे मासिक किराणा बजेट होय. योग्य नियोजन न करता खरेदी केल्यास अनावश्यक खर्च होतो आणि महिन्याच्या शेवटी आर्थिक अडचणी येऊ शकतात.

 

आता मुख्यता आपण जाणून घेऊयात की हे Monthly Grocery Budget कसे तयार करायचे ते ही अगदी सोप्या भाषेत.

 

2 ) मासिक किराणा बजेट कसे तयार करावे?

(१) आपल्या घरातील गरजा ठरवा

प्रत्येक घराचे किराणा खर्च वेगवेगळे असतात. कुटुंबातील सदस्यसंख्या, खाण्याच्या सवयी आणि आहार यानुसार गरजा वेगळ्या असतात.

🔹 अन्नधान्य – तांदूळ, गहू, डाळी, साखर, मीठ इ.
🔹 दुग्धजन्य पदार्थ – दूध, तूप, लोणी, चीज
🔹 भाज्या आणि फळे – हंगामी भाज्या आणि पौष्टिक फळे
🔹 मसाले आणि तेल – स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, खाद्यतेल
🔹 स्वच्छता आणि इतर वस्तू – साबण, डिटर्जंट, टिश्यू पेपर इ.

 

Monthly grocery

 

(२) महिन्याचा अंदाजे खर्च ठरवा

गेल्या काही महिन्यांचा किराणा खर्च पाहून त्याचा अंदाज घ्या आणि गेल्या महिण्यापेक्षा कमी खर्च करता आला तर ते ही पाहणं गरजेचं आहे . उदा.

लहान कुटुंबासाठी (२-३ सदस्य) – ₹४,००० ते ₹७,०००

मध्यम कुटुंबासाठी (४-५ सदस्य) – ₹८,००० ते ₹१२,०००

मोठ्या कुटुंबासाठी (६+ सदस्य) – ₹१२,००० ते ₹२०,०००

 

monthly grocery shopping

 

(३) किराणा सामानाची यादी तयार करा

एक यादी तयार करूनच खरेदीसाठी जा. यामुळे अनावश्यक वस्तू खरेदी होणार नाहीत आणि बजेटही नियंत्रित राहील जसं आपण नेहमीच करतोय आमच्या कडे तर नेहमीच एक किराणा यादी तयार असते बुवा .

📝 महिन्याच्या सुरुवातीला खरेदी करा:
घाऊक खरेदी – तांदूळ, गहू, डाळी, तेल, साखर
साप्ताहिक खरेदी – भाज्या, फळे, दूध
दर दोन-तीन महिन्यांनी – साबण, डिटर्जंट, डिश वॉश

 

३. मासिक किराणा खर्च वाचवण्यासाठी ५ उत्तम टिप्स

(१) घाऊक खरेदी करा

रोजच्या ऐवजी महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास मोठ्या सवलती मिळतात. बिग बझार, डी-मार्ट किंवा ऑनलाईन किराणा सेवांमध्ये अनेक ऑफर्स उपलब्ध असतात आणि तिथून ही खरेदी करताना आधी विचार करत जावा नाही तर ऑनलाईन च्या मागे जास्त पैसे खर्च व्हायचे.

(२) अनावश्यक वस्तूंना “नाही” म्हणा

सुपरमार्केटमध्ये अनेक आकर्षक वस्तू दिसतात आणि हे त्यासाठीच आकर्षक असतात की आपण ते घेऊ ते आपल्या बायका घेतात पण हा हा , पण त्या खरंच गरजेच्या आहेत का? अनावश्यक गोष्टी खरेदी केल्याने बजेट बिघडते.

 

monthly kirana list in marathi

(३) कूपन आणि डिस्काउंटचा वापर करा

Online किंवा ofline खरेदी करताना तुमाला माहित आहे की काही कुपन कोड्स उपलब्ध असतात ते शोधाण्याचा प्रयत्न करा म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदी करताना डिस्काउंट कूपन, कॅशबॅक ऑफर्स आणि कार्ड डिल्स शोधा.

(४) हंगामी भाज्या आणि फळे खरेदी करा

हंगामी भाज्या आणि फळे नेहमीच स्वस्त आणि पौष्टिक असतात. दररोजच्या आहारात त्यांचा समावेश केल्यास खर्चही कमी होतो.

(५) उरलेले अन्न वाया जाऊ देऊ नका

मित्रानो आपल्या सर्वांच्याच घरी नेमकेच जेवण बनवले जात नाही ते नेहमी extra च असतं म्हणून घरी शिल्लक अन्न व्यवस्थित साठवा आणि परत वापरा त्यामुळे आपल्या monthly Budget मध्येही खूप फरक येतो

. उदा. उरलेल्या भाताचा पोहे किंवा पराठा तयार करता येतो. यामुळे पैसे आणि अन्न वाचते.

 

मित्रांनो आपल्या घरच्यांना प्रत्येक वेळी ऑनलाईन खरेदी कारण जमेल च असं नाही कारण घरामध्ये कुटुंबामध्ये काही वृद्ध व्यक्ती ही असतात त्यामुळे त्यांना ऑनलाईन खरेदी करणं जमत नाही तितकी त्यांना माहितीही नसते म्हणून ते ऑफलाईन खरेदीला पसंती देतात म्हणजेच किराणा शॉप वर जाऊन खरेदी करतात पण मित्रांनो इंटरनेट च युग आहे तर ऑनलाईन खरेदीला ही आपण नाही म्हणू शकत नाही कारण तर ही करणं आजकाल सोप्प जात, कोण स्टोर ला जाणार कधी आणणार आणि कसे आणणार हे सर्व प्रश्न निर्माण होतात म्हणून कोणते योग्य आहे आणि कशा प्रकारे तर खाली दिलेल्या चार्ट वरून तुम्हाला स्पष्ट होईल.

 

Monthly grocery budget ofline or online

 

monthly grocery list in marathi

४. ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदी – काय फायदेशीर आहे?

घटक ऑनलाईन खरेदी ऑफलाईन खरेदी
किंमत बऱ्याच वेळा कमी किंमत घासाघीस करता येते
आराम घरी बसून खरेदी करता येते स्वतः निवडता येते
ऑफर्स कूपन आणि कॅशबॅक उपलब्ध बिग बझार, डी-मार्टमध्ये ऑफर्स असतात

 

जर वेळ वाचवायचा असेल तर BigBasket, JioMart, Amazon Pantry, Flipkart Grocery यांसारख्या ऑनलाईन सेवांचा वापर करा.

 

५. निष्कर्ष

मित्रांनो मासिक किंवा महिन्याचा किराणा बजेट योग्य प्रकारे नियोजन केल्यास पैसे वाचतात आणि आर्थिक शिस्तही राखता येते खास करून आपल्या घरातील महिला वर्ग आहे त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या करणं माणूस हा बाहेर जात असतो म्हणून किराणा किती घ्यायचा आहे त्याचा अंदाज हा पुरुषाला लागत नाही . अनावश्यक खर्च टाळून, योग्य ठिकाणी खरेदी करून आणि सवलतींचा फायदा घेतल्यास महिन्याच्या शेवटी आपल्याकडे जास्त पैसे शिल्लक राहतील आणि तीच गोष्ट आपल्याला आपले Monthy Budget बजेट तयात करताना उपयोगी ठरवू शकते .

किराणा बजेट ठरावण्यासाठी तुम्हला हा video ही मदत करून शकतो पहा 

 

grocery shopping marathi

👉 तुमच्या घरातील किराणा खर्च किती आहे? आणि तुम्ही पैसे वाचवण्यासाठी कोणते उपाय करता? कमेंटमध्ये नक्की कळवा!

आणि खाली share करण्यासाठी बटण दिलेले आहेत सोशल मीडिया चे तर तिथे जाऊन तुम्ही मित्रा परिवाराला share करू शकता 😊

Leave a Comment