Happy Makar Sankranti | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
मित्रांनो वर्षाच्या सुरवातीला म्हणजेच जानेवारी मध्ये जो पहिला सण येतो तो म्हणजे makar sankranti याच दिवशी आपण तिलगूळ सर्वांचे तोंड गोड करत असतो तर याच निमित्ताने आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा.
![]()
मकर संक्रांतीचे महत्व
Happy Makar Sankrant हा वर्षाचा पहिला सण आणि याची उत्सुकता ही आपण सर्वांनाच असते कारण या दिवशी आपण आपल्या परिवार जणांकडे जाऊन त्यांना गोड शुभेच्छा देत असतो त्यांची भेट घेत असतो.
गावाकडे थंडीच्या महिन्यात आणि वर्षाच्या पहिल्यांदा महिन्यात जे जे शेतात पहिले पीक घेतले जाते त्याची एक मिक्स भाजी बनवतात ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल आणि मुख्य म्हणजे थंडीचा महिना असतो तर या भाज्यांमुळे आणि तिळा मुळे आपल्याला ऊर्जा मिळत असते म्हणून मकर संक्रांतीला महाराष्ट्रात विशेष महत्व आहे
भारतात विविध ठिकाणी मकर संक्रांती चे महत्व
मित्रांनो जसे आपल्या महाराष्ट्रात संक्रांती ला विशेष महत्व आहे तसेच भारतातील विविध भागामध्ये संक्रांती ला महत्व आहे जसं मी पाहिले पंजाब मध्ये लोढी पेटवून मक्याच्या ल्हाया आणि गूळ अग्नी मध्ये अर्पण केले जातात आणि सर्वांनाच निरोगी स्वास्थ लाभवा याच्या शुभेच्छा दिल्या जातात.
दुसरं म्हणजे गुजरात
या ठिकाणी संक्रांती च्या दिवशी सर्व परिवार आणि मित्र मंडळी एकत्र येऊन पतंग उडवतात आणि आकाशा मध्ये रंगीबेरंगी छटा निर्माण होते जाणू आकाशाला ही थंडी वाजते आणि त्याला आपण आज्जी ने शिवलेली रंगीत गोधडी पांघरून घालतो किती नवल आहे ना सारच.
तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला मकर संक्रांती चे विशेष महत्व आणि शुभेच्छा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता हा प्रयत्न आवडला असेल तर जरूर मित्रांसोबत share करा.
बाकी तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा तर पुन्हा एकदा तुम्हाला happy makar sankranti