घरगुती बजेट कसे तयार करावे?
मित्रांनो घरगुती बजेट कसे तयार करावे? आणि हे तयार करून आपण श्रीमंत कसे होऊ शकतो या बद्दल आपल्याला संपूर्ण माहिती तर जाणून घ्यायचीच आहे पण त्या आधी आपण हे जाणून घेऊया की घरगुती बजेट का गरजेचे असते किंवा how to make your home budget
तर तुम्हाला माहीतच आहे माणूस श्रीमंत असो वा गरीब सर्वांनाच सर्वांना सामान पगार किंवा वेतन नसते जेणेकरून आपण आपल्या गरजा भगवून बचत करू शकतो त्यासाठी आपल्याला महिन्याचे एक ठराविक बजेट ठरवावं लागत की आपल्याला या महिन्यात मध्ये काय काय करायचे आहे आणि महिना अखिरी साठी पैसे किती वाचावायचे आहे

How to create a household budget?
घरगुती बजेट तयार करणे ही आर्थिक नियोजनाची एक महत्त्वाची पायरी आहे. यामुळे आपले खर्च आणि बचत यांचे संतुलन साधता येते. खाली दिलेल्या चरणांचा म्हणजेच पायऱ्यांचा उपयोग करून आपण घरगुती बजेट सहज तयार करू शकतो.
1 ) आपले उत्पन्न ओळखा:
- निव्वळ उत्पन्न: महिना किंवा वर्षाला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाचा अंदाज घ्या किंवा जो पैसा तुम्ही वर्षाभारत कमावता किती मिळकत आहे वगैरे याचा अंदाज घेणे खूप गरजेचं आहे . यामध्ये सर्व प्रकारच्या मिळकतीचे उत्पन्न आपल्याला काढले पाहिजे म्हणजेच आपल्या पगारात किती पैसा येतोय, व्यवसाय किंवा business मधून किती उत्पन्न येते, इतर कोणत्या ठिकाणी आपण जर गुंतवणूक केली आहे तर त्या गुंतवणुकीतुन निव्वळ परतवा किती येतोय हे सर्व पाहणे गरजेचे आहे म्हणजे आपल्याला महिन्याला किंवा वर्षाला किती उत्पन्न येते ही गोष्ट कळून येईल .
घरगुती बजेट कसे तयार करावे?
2 ) खर्चांचे वर्गीकरण करा:
स्थिर खर्च: या खर्चाचमध्ये कोणत्या गोष्टी मुख्यतः येऊ शकतात तर ते आपण जाणून घेऊयात पहिली गोष्ट आणि स्थिर खर्च म्हणजे
- घरभाडे/घरकर्ज :- मित्रांनो यामध्ये आपल्या सर्वांकडेच स्वतः च घर असतंच असे नाही पण जरी असलेच तर ते कोणत्या ना कोणत्या गृह कर्जातून निर्माण झालेले असणारे आहे तर त्या कर्जचे जे हफ्ते आहे तर ते आपल्याला महिन्याला भरावेच लागतात आणि यालाच आपण एक स्थिर खर्च बोलू शकतो आणि जर भाड्याने राहताय तर प्रत्येक महिन्याला घर मालकाला आपल्याला जे ठरलेले भाडे आहे ते द्यावेच लागते तर याला ही आपण स्थिर खर्चा मध्ये पाहू शकतो, पुढील उदाहरणं म्हणजे
- वीज बिल, पाणी बिल :- मित्रांनो आपण जी ही गोष्ट घरात वापरतो त्याच्या साठी आपल्याला एक ठराविक रक्कम ही मोजावीच लागते आणि त्यातील च महत्वाची गोष्ट म्हणजे वीज बिल आणि लाईट बिल याला आपण स्थिर खर्च म्हणू शकतो कारण वीज आणि पाणी हे दोन्ही पण आपल्या जगण्याचे साधनच म्हणावे लागेल आणि ती गरजही आहे तर त्या गोष्टी काही आपल्याला चुकलेल्या नाहीत त्यांचे जे महिन्याला आपण उपभोगत असलेल्या सुविधानच बिल हे द्यावाच लागत म्हणून याला आपण स्थिर खर्च बोलू शकतो किंवा बोलतात,आता तिसरं म्हणजे
- इतर कर्जाचे हप्ते :- इतर कर्जाचे हफ्ते आता यामध्ये आवर्जून सांगू इच्छितो मित्रांनो की घराचा खर्च हा आपल्या फक्त पगारावर चालत नाही किंबहुना तो चालवता ही येत नाही त्यासाठी आपल्या सर्वांनाच एखादे किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज हे घ्यावेच लागत असते आता ते ओळखीच्या लोकांकडून असो, पथपेढी मधून असो किंवा एखाद्या बँक कडून असो कर्ज हे घ्यावेच लागते त्याशिवाय आपल्या संसाराचा गाडा चालवता येतच नाही आणि म्हणूनच आपण या खर्चाला ही स्थिर खर्चात मांडत आहोत, तर मित्रांनो हे झाले स्थिर खर्च याचाच्याकडे आपल्याला विशेष लक्ष देणे खूपच गरजेचं आहे.
आता आपण पाहुयात पुढचा खर्च
चल खर्च:
- या खर्चाला स्थिर खर्च म्हणण्याचे एकमेव उद्देश किंवा कारण म्हणजेच प्रत्येक महिन्याला हे खर्च बदलत असतात. जसे की:
-
- अन्नधान्य खरेदी :- या खर्चच्या प्रकारामध्ये आपण ठराविक रकमपेक्षा जास्त किंवा कमी पैसे देत असतो, आता तुम्हाला उदाहरणं द्यायचं झाले तर माझ्या घरी आज पाहुणे आले आहेत तर त्यांच्या साठी मी जेवण बनवणार काही बाहेरील खाद्यपदार्थ असतील तर ते आणणार हे तर झालाच पण महिन्याचे राशन जे आपण किराणा मालाच्या दुकानातून जो किराणा भरतो त्या लिस्ट मध्ये कधीच कमी तर कधीच जास्त सामान किंवा वस्तू आपण मागवत असतो पण याचा खर्च ही तितकंच लवचीक असतो म्हणजेच मला या महिन्यात कमी वस्तूंची गरज आहे आणि दुसऱ्या महिन्यात जास्त वस्तूंची गरज आहे त्या नुसार हे घरगुती बजेट ठरत असते
- प्रवास खर्च :- मित्रांनो आपण नोकरी करत असू किंवा स्वतः चा व्यवसाय करत असू प्रवास हा करावाच लागतो आणि त्या प्रवासासाठी ठराविक रक्कम आपल्याला बाजूला काढून ठेवावीच लागते दुसरं म्हणजे आपल्याला अचानक कुठे जावे लागते आणि तिथे जाने ही अत्यंत महत्वाचे असते तर तो प्रवास आणि त्याचा खर्च आपण चल खर्च म्हणून पाहतो.
- करमणूक व इतर व्यक्तिगत खर्च :- आयुष्य म्हणले की पोटासाठी काम करावे लागते मेहनत करावी लागते आणि तुम्हाला माहीतच आहे की मनुष्यप्राणी म्हणजेच आपण किती मेहनत करतो पण मेहनती सोबत कारामणूक किंवा विरंगुळा हा आपल्याला हवा असतो तर हा खर्चाचा भाग म्हणजेच करमणूक चा खर्च आणि इतर व्यक्तिगत खर्च तर या बाबत तुम्हाला माहित असेल..
आकस्मिक खर्च:
- आपत्कालीन परिस्थितीत लागणारे पैसे, जसे की:
- औषधोपचार :- मित्रांनो अत्यंत अकसत्मिक खर्च हाच असतो आजच्या या प्रदूषण असलेल्या वातावरणात, धावपळीच्या युगात आपल्याला काहीही होऊ शकत हे गृहीत पकडून चला आणि जर काहीही होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला अतिरिक्त किंवा औषध उपचाराचा खर्च बाजूला काढून ठेवणे गरजेचे आहे.
- गाडी दुरुस्ती :- आता आपणा सर्वांनाच माहित आहे कदाचित क्वचितच असे काही लोकं असतील ज्यांच्याकडे गाडी नाही आहे, कोणतेही वाहन नाहीये, त्या मधील मी पण एक आहे 😃 तर या वाहनांची डागडुजी करणे ही गरजेचे आहे तर हा खर्च देखील आपल्याला बाजूला काढणे गरजेचे आहे
बजेट कसे ठरवायचे यापेक्षा मोठे उदाहरणं कोणतेच नाही तर नक्कीच खाली दिलेला video पाहायला विसरू नका
How To Make your Home Budget?
३. खर्चांचे निरीक्षण करा:
- मागील ३-६ महिन्यांचे खर्च तपासा :- मित्रांनो तुम्हाला आपल्या महिन्याचे बजेट काढता येत नसेल तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपल्या 3-6 महिन्याचे काय काय खर्च होतील ते निरीक्षण केले पाहिजेत त्यामधून आपल्याला कळून येईल की आपण कोणत्या महिन्यात किती खर्च केला आणि तो योग्य त्या ठिकाणी केला का म्हणजेच ठराविक महिन्याचा खर्च आपल्याला कळून येईल मग त्याचे नियोजन करण्यासाठी आपल्याला सहज सोपे जाईल.
- कोणत्या गोष्टींवर जास्त खर्च होतो आहे हे ओळखा. :- जसं आपण वर पाहिलं की कोणत्या महिन्यात किती खर्च होतं आहे आणि कोणत्या कारणासाठी होतोय तो करणे योग्य आहे की नाही हे सर्व पाहिलत तर तुमच्या डोक्याला जास्त लोड राहणार नाही
4 . बजेट तयार करा:
आता आपल्याला बजेट तयार करायला घेतले पाहिजे आणि ते नेमके कसे करायचं कोणालाच माहित नाही
1 ) 50-30-20 नियम: हा नियम तुम्ही कदाचित ऐकला असेल पण मला नाही वाटत कधी अमलात ही आणला असेल आणि जर आणला असता तर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत वाचलंच नसता. तर हा नियम काय म्हणतोय ते आपण पाहायला सुरवात करूया जे खाली विस्तारित करून सांगितले आहे
50%: आवश्यक गरजा (घरभाडे, अन्न, बिलं). :- या मध्ये मित्रांनो तुमच्या महिन्याच्या मिळकतीचा 50 टक्के भाग हा आवश्यक गरजासाठी उपयोग करायचा असतो,
उदाहरणं द्यायचं झालाच तर महिन्याचा किराणा झाला, दूध बिल झाले, लाईट बिल झाले आणखी काही जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यावर हा 50% भाग खर्च करायचा असतो.
30%: इच्छित खर्च (करमणूक, खरेदी). :- या मध्ये मित्रांनो आपण महिनाभर मर मर काम करत असतो त्यातून ही आपल्याला थोडाफार विरंगुळा हवा असतो म्हणून 30% भाग हा आपल्या कारामणुकीसाठी ठेवायांचाच आहे
20%: बचत आणि गुंतवणूक. :- हा 20% भाग हा हमखास आपल्या बचतीचा असणार आहे कारण सर्व गरजा तर भागल्याच आहे तर हा 20% भाग बचत करून कुठेतरी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
५. बचतीचे महत्त्व लक्षात ठेवा:
- तत्काल बचत निधी तयार करा: कमीत कमी ३-६ महिन्यांचे खर्च बाजूला ठेवा.
- दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करा. :- दीर्घ कालीन म्हणजेच आपण काहीतरी विचार केलेला असतो की इतक्या इतक्या वर्षात आपल्याला या या गोष्टी साध्य करायच्या आहेत तर या गोष्टी साठी गुंतवणूक ही झालीच पाहिजे.
६. खर्चाचा आढावा घ्या:
- दर महिन्याला बजेटचे पुनरावलोकन करा. :- याचा अर्थ असं आहे की दर महिन्याला आपला किती खर्च होतो त्याकडे आपले लक्ष असले पाहिजे किंबहुना आपण ते डायरी मध्ये लिहून ठेवले पाहिजे त्यावरून बजेट मध्ये काही गोष्टी होत असतील तर तसाच दुसऱ्या महिन्यात ही प्रयत्न करा
- अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा :- मित्रांनो जो आपण अनावश्यक खर्च करत असतो तो आपल्याला टाळायला पाहिजे
. डिजिटल साधने वापरा:
- बजेट तयार करण्यासाठी Money Manager, Walnut, या ॲप्सचा उपयोग करा.
- खर्च आणि बचतीचे विश्लेषण करणे सोपे जाईल.
. कुटुंबातील सदस्यांना सहभागी करा:
- बजेटमध्ये सर्वांची भूमिका निश्चित करा.
- खर्चावर एकत्र चर्चा करा.
उदाहरण:
| घटक | रक्कम (रु.) |
|---|---|
| मासिक उत्पन्न | 50,000 |
| आवश्यक खर्च | 25,000 |
| इच्छित खर्च | 15,000 |
| बचत/गुंतवणूक | 10,000 |
या प्रमाणे जर आपण आपले महिन्याचे बजेट ठरवत असू तर आपल्याला श्रीमंत होण्यासाठी कोणीच रोखू शकतं नाही लक्षात ठेवा
बाकी तुम्हाला हा लेख किंवा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच share करायला विसरू नका खाली बटण दिलेले आहेत आणि हो महत्वाचे म्हणजे कमेंट करून आपला mail id रजिस्टर करायला ही विसरू नका.
धन्यवाद